जयपूर/एनजीएन नेटवर्क
प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण ताजे असतानाच भारतातही असाच प्रकार उजेडात आला आहे. फेसबूकवरून ओळख झालेल्या प्रियकारासाठी भारतातील एक महिला पाकिस्तानात गेली आहे. या महिलेला दोन मुले असून जयपूरला जाऊन येते असे नवऱ्याला सांगून तिने थेट पाकिस्तान गाठले आहे.
राजस्थानच्या भिवडी जिल्ह्यातील एक विवाविहत भारतीय महिला पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे. अंजू असे या महिलेचे नाव असून तिच्या पतीचं नाव अरविंद आहे. जयपूरला जाते असं सांगून तिने घर सोडलं होतं. परंतु, रविवारी तिने भारतीय सीमा ओलांडली असल्याची माहिती पती अरविंदला प्रसिद्धी माध्यमांद्वारे मिळाली. पाकिस्तानात आपल्या प्रियकाराला भेटायला गेलेल्या अंजूने तिचा पती अरविंदसोबत व्हॉट्सअॅपवर संपर्क ठेवला होता. ती सध्या लाहोरला असून दोन तीन दिवसांत परत येणार असल्याचे तिने अरविंदला सांगितलं आहे. धक्कदायक म्हणजे आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे अरविंदला माहित आहे. परंतु, ती परत येईल या आशेवर तो आहे.