NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

देशात लवकरच धावणार इथेनॉलवरील मोटारगाड्या; गडकरी..

0

 नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच 100 टक्के इथेनॉलवर कार धावेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी त्यासाठी खास आग्रही आहे. प्राप्त माहितीनुसार ही कार टोयोटाची इनोव्हा अथवा केमरी असू शकते. यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी हायड्रोजन कारचा प्रवास केला होता. अनेक भाषणात गडकरी यांनी आपण पेट्रोल-डिझेलच्या कारचा प्रवास बंद केल्याचे सांगितले आहे.

दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान गडकरी यांनी या कारची माहिती दिली. 29 ऑगस्टला टोयोटाच्या कारच्या उद्धघाटन करणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात जाहीर केले होते. ही कार 100 टक्के बायोइथेनॉलवर धावेल. या कारचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, ती इथेनॉलसह हायब्रिड प्रणालीवर 40 टक्के वीज निर्मिती करेल, त्याचाही प्रवासासाठी वापर करता येईल. ही कार जगातील पहिली BS6 फेज-2 इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-इंधन कार असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्टार्च आणि साखरेच्या किण्वातून इथेनॉल तयार होते. हे एक प्रकारचे अल्कोहोल असते. पेट्रोलमध्ये मिसळून ते वापरण्यात येते. ऊसाच्या रसापासून, मका, बटाटे, कुजलेला भाजीपाला, स्टार्चयुक्त पदार्थातून इथेनॉल तयार करण्यात येते. देशभरात इथेनॉल पंप सुरु करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या योजनेवर काम सुरु आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याची योजना आहे. त्यासाठी 1,000 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. दोन वर्षांनी देशभरात असे पंप मोठ्या प्रमाणात उभारण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.