NGN News
Latest Marathi News

भारत आत्मनिर्भरतेकडे : आ. पाचपुते; भाजपचे ‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकल फॉर व्होकल आणि स्वदेशीचा नारा दिला. विविध क्षेत्रात भारताने स्वदेशी उत्पादने निर्माण केली. छोटया छोटया देशांनी पुर्वी अर्थव्यवस्था क्रमवारीत भारताला मागे टाकले होते. आज भारत जागतीक क्रमवारीत चवथ्या क्रमांकावर असून येत्या काही दिवसात भारत तिसऱ्या स्थानी येणार आहे. याचे कारण आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान आहे. दुरदृष्टी व स्वदेशी जनजागर यामुळे देशात स्वदेशी मोहिम यशस्वी झाली असून आता भारत जगाचे नेतृत्व करत असल्याचे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान कार्यशाळेचे प्रदेश संयोजक आ.विक्रम पाचपुते यांनी सांगितले.

भाजपच्या वतीने वसंतस्मृती कार्यालयात सोमवारी ( दि. २२) ‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’ कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी आ.पाचपुते  बोलत होते. याप्रसंगी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने स्वदेशीचा जागर करा,व्होकल फॉर लोकल,स्वदेशीचे उत्पादन वाढ व स्वदेशी खरेदी व विक्री उपक्रम बूथ स्थरापर्यंत नेण्याचे आवाहन केले. केंद्राने काही घरगुती अत्यावश्यक वस्तुंवरचा जी एस टी कमी केला. काही वस्तुंवर जी एस टी १०० टक्के माफ केला आहे. त्यामुळे स्वदेशी वस्तुंचे बाजारात दर कमी होणार असून त्यांचाही फायदा ग्राहकांना होणार असल्याचे आ.पाचपुते यांनी सांगितले.

 येत्या २६ तारखेपासून या अभियानाची सुरुवात देशभर होणार असून केंद्रीय नेते, मंत्री, खासदार, आमदार,पदाधिकारी ते बूथ प्रमुख सर्वांनी या अभियानाचा प्रचार व प्रसार करावा असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार,दक्षिण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुनिल बच्छाव,सरचिटणीस सुनिल देसाई, ॲड.श्याम बडोदे,सोनाली कुलकर्णी, शरद कासार,लता राऊत,रणजीत देशमुख या कार्यशाळेचे संयोजक, सहसंयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.