नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
भारताने 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. ‘मन की बात’ या आपल्या 102 व्या भागाच्या प्रसारणात त्यांनी हा संकल्प जाहीर केला.
पंतप्रधान म्हणाले, हा संकल्प नक्कीच खूप मोठा आहे. एक काळ असा होता की क्षयरोगाविषयी समजल्यानंतर कुटुंबातील सदस्य दूर निघून जायचे, पण आजच्या काळात क्षयरोगाविषयी समजले की कुटुंबातील लोकं रुग्णाची व्यवस्थित काळजी घेतात.