NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अमेरिकेनंतर भारतात महत्तम रस्ते जाळे; लांबी 59 टक्क्यांनी वाढली

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीमुळे भारताकडे आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे  झाल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत केले. ईशान्येकडील रस्ते महामार्गाच्या जाळ्याच्या विस्तारावर विशेष भर देण्यात आला आहे. या प्रदेशात दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे प्रकल्प राबवले जात असल्याचे गडकरींनी सांगितले.

2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 91,287 किमी होती. ती 2022-23 मध्ये 1,45,240 किमीपर्यंत वाढलल्याचे गडकरी म्हणाले. या कालावधीत ही लांबी 59 टक्क्यांपेक्षा अधिक  वाढली आहे. गेल्या नऊ वर्षांत चौपदरी राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये चौपदरी राष्ट्रीय महामार्गांची  लांबी 18,371 किमी होती. जी गेल्या नऊ वर्षात 44,654 किमी झाली असल्याचे गडकरींनी सांगितले. फास्टॅग  (FASTag) लागू झाल्यामुळे पथकर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. पथकारामधून  मिळणारा महसूल 2013-14 मधील  4,770 कोटी रुपयांवरून 2022-23 मध्ये 41,342 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे गडकरी म्हणाले. 2030 पर्यंत पथकर महसूल 1,30,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 

फास्टॅगने क्रांती घडवली

फास्टॅगने पथकर भरण्याच्या  संकल्पनेत क्रांती घडवून आणली आहे. रोख व्यवहारांची गरज संपुष्टात आणली आहे , असे गडकरी म्हणाले. एका संशोधनानुसार,  या महत्वाच्या उपक्रमामुळे  पथकर नाक्यांवर  वाहने थांबल्यामुळे वाया जाणार्‍या इंधन खर्चात अंदाजे 70,000 कोटी रुपयांची बचत झाल्याचे गडकरी म्हणाले. शाश्वत भविष्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरुन पुढील पाच वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, स्वच्छ ऊर्जेला चालना देणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा दृष्टीकोन असल्याचे गडकरी म्हणाले. 

Leave A Reply

Your email address will not be published.