घोटी/राहुल सुराणा
इगतपुरी तालुक्यात गेल्या महिन्यापासून संततधार पाऊस सुरू असून सलग पावसाने इगतपुरी तालुका जलमय झाला आहे. विशेष तालुक्यातील मोठी व मध्यम धरण प्रकल्पात भरीव वाढ झाली असून दारणा, भावली, भाम प्रकल्पातून मोठया प्रमाणात विसर्ग सुरू आहे.. दरम्यान दारणा,भावली, भाम ही धरणे ओव्हरफ्लो झालेली असून त्यात विशेष बाब म्हणजे तालुक्याचे भूषण असलेल्या भावली व भाम धरण १०० % भरले असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यात एकुण सरासरीच्या ६० टक्के पाऊस झाल्याने हा जिल्ह्यासह मराठवाड्यास सुद्धा समाधान झाले आहे.
इगतपुरीत महिन्याच्या वरती सुरू असलेल्या पावसाने शेतीच्या कामात सुद्धा प्रगती आहे. पूर्व भागात सुद्धा शेतीच्या कामाने वेग घेतला आहे. तालुक्यात धरणांच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत झाल्याने दारणा, भावली, भाम धरणातून विसर्ग सुरू आहे. कडवा धरणाचा विसर्ग बंद केला आहे. दारणा धरणातून आज स्थितीत १२५० क्यूसेक विसर्ग सुरू असून आज ९१. ७२ % टक्के साठा संचित झाला आहे. तर कडवा प्रकल्पात ८७. ०९ टक्के साठा आज संचित आहे. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात २४५.. २२ दलघमी पाण्याचा साठा झाला असून एकूण ७४ % साठा संचित झाला आहे.
इगतपुरी तालुक्याचे पाण्याचे कोठार समजल्या जाणा-या संपूर्ण तालुक्याची पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून असलेल्या भावली धरणाचा साठा पूर्णपणे भरल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. इगतपुरी तालुक्याला लाभलेले निसर्गाचे वरदानच म्हणावे असे,दाटधुके,धबधबे,मुसळदार पाऊस असा नयनरम्य नजारा भावली परिसरात पाहावयास मिळतो. वेळेतेच पाणीसाठा निर्माण झाला असून,परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहावयास मिळत आहे. जिल्यात सर्वप्रथम इगतपुरी तालुक्यातील भावली धरण व नंतर भाम धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले , निसर्गाचा हि कृपा व वरदहस्त या इगतपुरी तालुक्यावर आहे. उर्वरित अन्य धरणेही असाच पाऊस सुरु राहिला तर लवकरच भरतील.
गेल्या महिन्यापासून झालेल्या पावसाने इगतपुरी तालुक्यात चांगलीच मजल मारली आहे. आजही चोवीस तासात रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २९ मिमी पावसाची नोंद झाली असून समाधानकारक आकडवाडी झाली आहे. तालुक्यात वार्षिक एकूण सरासरीच्या ६० टक्के पेक्षा पाऊस महिन्याभरात झालेला असून एकूण २२४५ मिमी पाऊस तालुक्यात झाला आहे.
—-पाऊस रविवारी सकाळी ६ पर्यंत : २९ मिमी
————-
विसर्ग : दारणा – १२५० क्यूसेक भावली – १३५ क्यूसेक भाम – ८२३ क्यूसेक——————धरणातील साठा — आज रविवारी सकाळी सहा आजेपर्यंतधरण नाव साठ्याची टक्केवारी आजपर्यंत साठा (दलघफू) सकाळी ६ वाजेपर्यंत झालेला पाऊस मिमी मध्ये दारणा – ९१. ७२ टक्के ६५५७ १०भावली – १०० टक्के १४३४ २९
मुकणे – ७३. १९ टक्के ५२९८ ८
कडवा – ८७. ०९टक्के १४७० १० वाकी – ५२. ५७ टक्के १३१० १८भाम – १०० टक्के २४६४ २६वैतरणा : ७४ टक्के २४५. २२ दलघमी व एकूण पाऊस २२४५ मिमी