घोटी/राहुल सुराणा
इगतपुरी तालुक्याच्या गाजलेल्या आमसभेत घोटी बस स्थानकातील महिला-विद्यार्थिनीच्या सौचाल्याची सोय नसल्याने नागरिकांनी असंतोष निर्माण केला होता. याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेल्या शब्दाला जागून दोनच दिवसात कामकाज सुरु होईल असा शब्द दिला होता. पंधरा लाख रुपये निधीची तातडीच्या प्रयत्नांनी सोमवार ( दि. १९ ) रोजी आमदार निधीतून शौचालय बांधण्याचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, वामन खोसकर यांच्या हस्ते करण्यात आला.
इगतपुरी तालुक्यातून हजारो विद्यार्थिनी महिला नित्याने शाळा, महाविद्यालय, बाजारात येत आहे. मात्र बस स्थानकात कोणत्याही प्रकारे सौचल्याची सोय गेल्या अनेक वर्षांपासून बंद होती. नागरिकांसह महिलांची होणारी कुचंबना होत होती. याबाबत आमसभेत नागरिकांनी समस्या आमदारांना सांगताच आमदारानीं दिलेला शब्द दोनच दिवसात पूर्ण करत पंधरा लाख रुपये मंजूर करत सौचाल्याचे कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे अनेक महिला विद्यार्थीनी, विद्यार्थी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मुख्य बाजार पेठ असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने याठिकाणी सौचाल्याची गरजेचे होते. आमदारांच्या गतिमान निर्णयाने घोटीसह तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजर समितीचे संचालक दिलीप चौधरी,वामन खोसकर,उपसरपंच स्वाती कडू, रामदास जाधव,ग्रामसेवक रवींद्र धुंदाळे,नारायण जाधव,गणेश घोटकर, भास्कर गुंजाळ, सचिन तारगे,काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे आदी उपस्थित होते.