NGN News
Latest Marathi News

हवामान खात्याचा ताजा अंदाज..ऑक्टोबर ‘हिट’ नाही तर ‘तोच’ ठरणार हिट !

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्यभरात पावसाने घातलेले थैमान हळूहळू ओसरत असतानाच भारतीय हवामान खात्याने ऑक्टोबर महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात नेहमी जाणवणारे उन्हाचे चटके बसणार नसल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यातही सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

यंदा नेहमीपेक्षा आठवडाभर आधीच दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाने आपला मुक्कामही जरा जास्तच लांबवला आहे. यंदाच्या तुफानी पावसाने निर्माण केलेले अस्मानी संकट अभूतपूर्व स्वरूपाचे आहे. पूरस्थिती आटोक्यात येत असतानाच नवा अंदाज धडकी भरवणारा आहे. देशात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी पावसाच्या 108% पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात या चार महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा 139% पाऊस झाला. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. एकट्या सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात सरासरीच्या 215 टक्के तर ऑगस्ट महिन्यात 169 टक्के एवढा पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने प्रसृत केली आहे. 

Comments are closed.