पुणे/एनजीएन नेटवर्क
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा अन् इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. गेले काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाचा पाऊस जोर वाढला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
जुलैचा पंधरवाडा लोटला तरीही राज्यातील धरणात अवघा ३० टक्केच जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणात सरासरी तब्बल १६ टक्के पाणीसाठा कमी आहे. मान्सून लांबल्याने आणि धरणक्षेत्रात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने राज्यातील धरणे केवळ ३० टक्केच भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्याची चिंता वाढवली आहे