सटाणा/विशेष प्रतिनिधी
समको बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या बेकायदेशीर कर्ज प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी करण्यात आलेल्या उपोषणाची आज तिसऱ्या दिवशी सांगता झाली. येत्या ३१ ऑगस्ट अखेर उपोषणकर्त्यांच्या सर्व तक्रारींची चौकशी करुन लेखी खुलासा सादर करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
दि.सटाणा मर्चंट को ऑपरेटिव्ह बॅक ली. सटाणा ह्या बॅकेच्या नामपूर शाखेत कर्जदार, तात्कालीन संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमताने केलेल्या बेकायदेशीर रक्कम रुपये २५ लाखाचे कर्ज प्रकरणाबाबत व अन्य सभासद हिताच्या विविध न्याय मागणीसाठी बॅकेचे सभासद मयूर प्रकाश अलई हे गेल्या १ ऑगस्ट पासून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, मार्केट यार्ड, सटाणा येथे बेकायदेशीर प्रकरणाचे जामीनदार शालिग्राम बागुल व आशिष अलई यांना सोबत घेऊन आमरण उपोषणास बसले होते. सदर उपोषणास बसलेल्या सभासदाकडे सहकार विभागाच्या जिल्हा प्रशासनाने, बॅक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने व त्यांच्या रास्त मागण्या दाबल्या जात असतांना जिल्हा प्रशासनाकडून ही उडवाउडवीची लेखी पत्र दिली जात होती व कुठलाही ठोस निर्णय देण्यास टाळाटाळ करीत होते
मात्र आज उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरीही उपोषणकर्ते मयूर प्रकाश अलई हे उपोषणावर ठाम असल्याने अखेर जिल्हा सहकार प्रशासनाने येत्या ३१ ऑगस्ट अखेर उपोषणकर्त्यांच्या सर्व तक्रारींची चौकशी करुन लेखी खुलासा सादर करणार असल्याचे आश्वासनावर उपोषण सोडण्याची विनंती सहकार प्रशासनाने केली. त्यानंतर उपोषण कर्त्यांना आयपीएस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांच्या हस्ते रस पाजून उपोषण सोडण्यात आले. यावेळी सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके, पीएसआय किरण पाटील, सचिव भास्कर तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे, डॉ. प्रकाश जगताप, डॉ येवलकर, बाळासाहेब भांगडिया, यशवंत येवला, शामकांत बागड, अनिल ततार, किशोर गहिवड, दत्तात्रेय कापूरे , वसईकर साहेब, छोटू सोनवणे, रविंद्र सोनवणे, राजेंद्र खानकरी, शशिकांत सोनवणे , चंदूमामा अहिरे, सतिष पाटकर सह बॅकेचे सभासद बांधवांसह कर्मचारी उपस्थित होते.