नाशिक/एनजीएन नेटवर्क
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1नाशिक यांनी अवैध वाहतुक करणाऱ्या इसमास पकडून त्याच्या वाहनातून रूपये 44 लाख 82 हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मद्यसाठा वाहतुक करणारे वाहन मुंबई -आग्रा रोडने द्वारका येथे थांबविण्याचा प्रयत्न भरारी पथकाने केला असता वाहनचालकाने वाहन अधिक वेगाने उड्डाणपुलावरून आडगावच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले. भरारी पथकाने पाठलाग करून आडगाव शिवारात सदर वाहन आडवून वाहनाची तपासणी करण्यात आली असता वाहनात पॅम्पर मेडीसीनच्या प्लॅस्टिक गोण्या आढळल्या व गोण्यांच्या मागे दादरा नगर हवेली या ठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या विदेशी मद्याचे 250 बॉक्स व बिअरचे 80 बॉक्स असे एकूण 330 बॉक्स आढळून आले आहेत. या साठ्याची एकूण किंमत 44 लाख 82 हजार 800 इतकी आहे. हा मद्यसाठा वाहतुक करणारे वाहन महिंद्रा कंपनी निर्मित फुरीओ-17D सहाचाकी टेम्पो एम.एच.04 के.यु. 3360 क्रमांकाचे असून वाहन चालकाचे नाव शहबाज हुसेन अन्सारी असे आहे. वाहनचालका बढुपर, जिल्हा कैमुर, राज्य बिहार येथील रहिवासी असून यास अटक करण्यात आली आहे. मद्य खरेदी, वाहतुक व विक्री करणारे फरार असून याकामी तपास सुरू आहे.