घोटी/राहुल सुराणा
इगतपुरी तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊसाची बॅटिंग सुरू होती सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस झाला. आज सकाळपर्यत जवळपास 90 मि मी असा विक्रमी पाऊस झाला. या पावसाने शेतांमध्ये तसेच रस्त्यावरही पाणीच पाणी दिसत होते. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून बाजारपेठांमध्येही तुरळक गर्दी होती. दरम्यान पावसाने पाणीपातळीत काहीशी वाढ होताच कडवा धरणातून दिवसभरात दोन वेळा विसर्ग काहीसा वाढविण्यात आला.
पंधरा दिवसाच्या ब्रेकनंतर दमदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला. तालुक्यातील भात पिकाला पोषक म्हणून खते मारल्यानंतर पावसाने दडी मारली होती आता मात्र भात पिकांले तररली आहे.ऐन पोळ्याच्या तोंडावर पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. घोटी, इगतपुरी, काळुस्ते, वैतरणा परिसरासह पूर्व भागातही पावसाच्या सरी कोसळत होत्या. महामार्गावरही वाहनांना रस्त्यातील अडथळे तर घाट परिसरात धुक्याच्या साम्राज्यसह जोरदार पावसाशी सामना करावा लागल्याने वाहने चालवणे हे त्रासदायक ठरत असल्याने महामार्गावर वाहनांचा वेग व गती मंदावली होती.
कडवा धरण विसर्ग
आज (दि ८) रोजी दुपारी 2 वाजता ८४८ क्यूसेक्स होता, दुपारी ३ वाजता ८४८ क्यूसेकने वाढवून एकूण १६९६ क्यूसेक करण्यात आला.