स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपक्रम; सन्मानचिन्हे देऊन गौरव
इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क
मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील 96.64 किमी वडपे–गोंदे कॉरिडॉरचे कन्सेशनर इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड (IHPL) यांनी 79वा स्वातंत्र्य दिन सुरक्षित व सबळ समुदाय घडविण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपक्रमांसह साजरा केला. इगतपुरीतील IHPL च्या MBC कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ‘नारी सन्मान, नारी शक्ती’ महिलांच्या सुरक्षेसाठीचे प्रशिक्षण, अग्निशमन दलाच्या शौर्याचा गौरव, सर्व कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा शपथ तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार व सादरीकरण करण्यात आले.
‘नारी सन्मान, नारी शक्ति’ या सुरक्षा प्रशिक्षण उपक्रमात महिला कर्मचारी आणि स्थानिक लोक एकत्र आले होते. हे प्रशिक्षण कसारा पोलिसांच्या सहकार्याने घेण्यात आले. ऑक्टोबर 2024 मध्ये IHPL तर्फे सुरू झालेला हा उपक्रम महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी समर्पित असून कामाच्या ठिकाणी तसेच समाजात महिलांच्या सन्मान, लैंगिक समानता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे. ‘नारी सन्मान’ म्हणजे महिलांचा सन्मान आणि ‘नारी शक्ति’ म्हणजे त्यांच्या सामर्थ्याची आणि सक्षमीकरणाची दखल, यामुळे या उपक्रमाचे महत्त्व आहे. या उपक्रमामुळे कामाच्या ठिकाणी तसेच त्यापलीकडेही सुरक्षित, आदरयुक्त आणि सहकार्यशील वातावरणाला चालना मिळते. IHPL चा हा प्रदेशातील पहिलाच अनोखा उपक्रम असून सुरक्षा आणि सामाजिक कल्याणावर त्यांचा सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. सहभागी महिलांना यामध्ये प्रत्यक्ष सेल्फ-डिफेन्स तंत्र, कार्यस्थळावरील सुरक्षा जागरूकता आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यावा, याचे मार्गदर्शन देण्यात आले. राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 2024 मध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 15 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे असे कार्यक्रम हे सार्वजनिक ठिकाणी व महामार्ग कॉरिडॉरवर महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहेत.
IHPLने आपल्या फायर ब्रिगेड टीमचा विशेष गौरव केला. 21 मे 2025 रोजी मुंडेगाव येथील जिंदल फिल्म फॅक्टरीतील आगीच्या घटनेदरम्यान या पथकाने शौर्यपूर्ण कामगिरी बजावली होती. इगतपुरी तहसीलदारांकडून तातडीचा कॉल मिळाल्यानंतर अग्निशामक राजाराम गायकवाड व त्यांची टीम काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली आणि आपत्ती व्यवस्थापन पथके येईपर्यंत तब्बल तीन तास आग विझविण्याचे कार्य केले. यामुळे कॉरिडॉरवरील आपत्कालीन परिस्थितींना तत्काळ प्रतिसाद देण्याची IHPL ची सज्जता अधोरेखित झाली.
“खरा देशभक्तीचा अर्थ केवळ एक दिवस साजरा करण्यात नाही, तर आपल्या समाजाचे रक्षण आणि पाठबळ देण्याच्या दैनंदिन बांधिलकीत आहे. इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आम्ही रस्ता सुरक्षा व समुदाय कल्याणाला वडपे–गोंदे कॉरिडॉरवरील आमच्या कामाच्या केंद्रस्थानी मानतो. आज आम्ही शौर्याचा गौरव केला, सुरक्षेत भर घातली आणि ‘नारी सन्मान, नारी शक्ति’ या बांधिलकीला बळकटी दिली, जेणेकरून महिलांना प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये व आत्मविश्वास प्राप्त होईल,” असे हेमंत कुमार, प्रोजेक्ट हेड, IHPL यांनी सांगितले.
या कार्यक्रमात टोल ऑपरेशन्स, नागरी व विद्युत देखभाल, आपत्कालीन प्रतिसाद आणि प्रशासन या विभागांतील तिमाहीतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्हे देऊन गौरवान्वित करण्यात आले. IHPL वडपे–गोंदे कॉरिडॉरवरील सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. यामध्ये जलद आपत्कालीन प्रतिसाद, कायदा अंमलबजावणी यंत्रणांशी समन्वय आणि शिक्षण, आरोग्य व महिला कल्याणाला चालना देणारे प्रत्यक्ष उपक्रम यांचा समावेश आहे. या प्रयत्नांमधून कंपनीची ही ठाम भूमिका स्पष्ट होते की, सुरक्षित व सक्षम समाज हा कार्यक्षम महामार्ग नेटवर्कच्या केंद्रस्थानी असतो.
Comments are closed.