मुंबई/एनजीएन नेटवर्क
मध्यान्ह भोजनात शालेय विद्यार्थ्यांना आता पौष्टिक आणि चवदार जेवण मिळणार आहे. कारण मध्यान्ह भोजनात आता खिचडीसोबतच इतर काही पदार्थांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचे सत्त्व आणि पराठाही मिळणारे आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या समितीने शिफारस केली आहे.
मध्यान्ह भोजन पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. मध्यान्ह भोजन तयार करणा-या व्यक्ती, संस्थांच्या मानधनात वाढ करण्याचीही शिफारस आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने शिफारस केल्यानुसार दर दोन दिवसांनी आहार बदलावा लागणार आहे. खिचडीसोबतच इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचं सत्त्व आणि पराठाही मिळणार आहे.