सटाणा/एनजीएन नेटवर्क
येथील स्वराधना बहुउद्देशीय संस्थे मार्फत प्राथमिक विद्या मंदिर ,दत्तनगर येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारती पवार यांनी भूषवले.
स्वराधना संस्थेच्या सदस्या डॉ. विद्या सोनवणे यांनी मुलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून मुलांचे कौतुक केले. आजची पिढी सक्षम असेल तरच देशाचे भविष्य सोनेरी असते म्हणूनच तळागाळातील कुठलाही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून स्वराधना संस्था अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असते, अशी माहिती त्यांनी दिली. संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती भांगडिया यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गरजूंना मदत करण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रतिष्ठित आणि दानशूर व्यक्तींनी मदत करण्यास पुढे यावे असे आवाहन केले. संस्थेच्या उपाध्यक्ष माधुरी जोशी यांच्यातर्फे मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सचिव दिनकर निकम,सरचिटणीस चेतन निकम, मुख्याध्यापिका मंगला शिंदे ,उपशिक्षक शरद नंदाळे ,सहशिक्षक सहदेव बच्छाव , सहशिक्षिका सपना ठाकरे, स्वराधना संस्थेच्या कोषाध्यक्ष उज्वला जाधव, डॉ. विद्या सोनवणे, शिल्पा भांगडिया, वर्षा पहाडे, संगीता मोरे आदि उपस्थित होत्या.