येवला/एनजीएन नेटवर्क
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ममदापूर ग्रामपंचायतचे सरपंच सयाजी गुडघे पाटील, विद्यमान सदस्य यांच्या हस्ते नूतन माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, विनोदी कार्यक्रम सदर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. याप्रसंगी मुख्याध्यापक शेलार, आहेर सर, चव्हाण सर, आहेर मॅडम, उशीर सर, हिरे सर, वाघ सर, तांबे सर, विलास तात्या सर, तसेच ममदापूर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.
त्याचबरोबर ममदापूर जिल्हा परिषद शाळेचे नवनियुक्त शालेय समितीचे अध्यक्ष जनार्दन जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात अध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग लक्ष्मण राठोड, अतुल दुसाने, ललित वाकचौरे, माधुरी भोये, देविदास गुडघे पाटील, नाशिक वारकरी मंच संपर्क प्रमुख, हिरामण सदगीर, भिका अण्णा गुडघे, ममदापूर सोसायटी चेअरमन राजाराम शिंदे, सर्व संचालक मंडळ, विजय गुडघे, राजापूर महाराष्ट्र बँक शाखा अधिकारी कैलास आर्या, दीपक गुडघे, आप्पा वैद्य, गणेश गायकवाड, निवृत्ती शिरसाट, भाऊसाहेब सोनवणे, गोरख वैद्य, मच्छिंद्र साबळे, मोहन बैरागी,नवनाथ अहिरे, प्रकाश वनसे, संजय म्हस्के, दत्तू केरे, संतोष भोसले, सोमनाथ केरे, समाधान पवार, अभिषेक कुलकर्णी, राहुल वाघ, कैलास बैरागी, अरुण राठोड, त्याचबरोबर विविध संघटनेचे पदाधिकारी बचत गटाचे पुरुष व महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते