नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
आयसीसी वन डे विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आज संपली आहे. टूर्नामेंट सुरू होण्याच्या अगदी १०० दिवस आधी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबईत सकाळी ११.३० वाजता बीसीसीआयने एक पत्रकार परिषद घेत विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले. भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित महामुकाबला अहमदाबादमध्येच खेळवण्यात येणार आहे.
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी प्रस्तावित सामने आणि स्थळांची रूपरेषा देणारा मसुदा वेळापत्रक जूनमध्ये देशांना पाठवला होता. मात्र, या मसुद्यावर पाकिस्तानने खोडा घातला होता. मसुद्यानुसार, सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये गतविजेत्या इंग्लंडचा उपविजेता न्यूझीलंडशी सामना होणार आहे. तर, अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
भारत-पाक अहमदाबादला भिडणार
विश्वचषकादरम्यान, ४५ सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये १० संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्यानरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक
८ ऑक्टोबर वि ऑस्ट्रेलिया चेन्नई
११ ऑक्टोबर वि अफगाणिस्तान दिल्ली १
१५ ऑक्टोबर वि पाकिस्तान अहमदाबाद
१९ ऑक्टोबर वि बांगलादेश पुणे
२२ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड धरमशाला
२९ ऑक्टोबर वि. इंग्लंड लखनऊ
२ नोव्हेंबर वि. क्वालिफायर २ मुंबई
५ नोव्हेंबर वि. दक्षिण आफ्रिका कोलकाता
११ नोव्हेंबर वि. क्वालिफायर १ बंगळुरू