NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

आयसीसी कसोटी क्रमवारी ! अश्विन, जडेजाची अव्वलता कायम; रोहित..

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित सध्याच्या यादीत सर्वोच्च रँकिंग असलेला भारतीय फलंदाज बनला आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विन आणि गोलंदाजीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम आहेत. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल फलंदाजांच्या क्रमवारीत ७३ व्या क्रमांकावर आहे. यशस्वीचे ४२० रेटिंग गुण आहेत.

आयसीसीच्या ताज्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत रोहित दहाव्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या दहामध्ये तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. यामध्ये न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर तर मार्नस लबुशेन पाचव्या क्रमांकावर आहे. युवा फलंदाज यशस्वी ७३ व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शानदार कामगिरी करताना त्याने शतक झळकावले.

रविचंद्रन अश्विन कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचे ८८४ रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जेम्स अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर आहे.

कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर आहे. जडेजाचे ४४९ रेटिंग गुण आहेत. अश्विन अष्टपैलूंच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे ३६२ रेटिंग गुण आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आहे. अक्षरचे ३०३ रेटिंग गुण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.