मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यांनी प्रतिक्रिया देणेही टाळले होते. त्यानंतर अजित पवारांवर नेमकी कोणती जबाबदारी असणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचे पद हे मुख्यमंत्री समान असते. मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्याची राज्यात मोठी भूमिका असते आणि कार्यध्यक्ष झाल्यावर राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे असणार आहे, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले. यावरुन राज्याची जबाबदारी अजित पवारांवर असल्याचा अंदाज आहे.