जळगाव/एनजीएन नेटवर्क
भाजपच्या इशाऱ्यावर तपास यंत्रणांनी माझ्यावर 130 धाडी टाकल्या पण मी घाबरलो नाही. माझ्या सहा वर्षाच्या नातीची कॅडबेरीचे आमिष दाखवून अर्धा तास चौकशी केली. मात्र मी घाबरलो नाही, अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जळगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी देशमुख यांनी सत्ताधारी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. देशमुख म्हणाले, आपल्या पक्षातील वरिष्ठ सहकारी हे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले, अशी टीका त्यांनी केली. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि शेवटपर्यंत शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
देशमुख म्हणाले, मला 14 महिने जेलमध्ये ठेवले. माझ्यावर 100 कोटींचा आरोप झाला. पण ईडीने चार्जशीट दाखल केली त्यामध्ये 1 कोटी 71 लाखांचा आरोप केला. 100 कोटीवरुन 1 कोटी 71 लाखांवर आले. माझ्याकडे समझोता करायला आले तेव्हा मी त्यांना सांगितले की, अनिल देशमुख आयुष्यभर जेलमध्ये राहील. पण तुमच्यासोबत येणार नाही.