NGN News
Latest Marathi News

मी विरोधी आमदार नाही : सत्यजित तांबे; सत्यजित सर्वांचाच : बाळासाहेब थोरात

संगमनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क

कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांच्या वक्तव्याचा व धमकीचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर शहरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात यांचे भाचे तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हेदेखील सहभागी झाले. यावेळी केलेल्या भाषणात आ. तांबे यांनी, तुम्ही सत्ताधारी आमदार असला तर मी देखील विरोधी आमदार नाही असा उल्लेख करत स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्यावर टिकास्त्र सोडले. दुसरीकडे, सत्यजित तांबे हा स्वतंत्रच आहे. त्याला सर्वच पक्षाच्या लोकांनी मत दिली त्यामुळे तो सर्वांचाच असल्याचे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. 

 याप्रसंगी आ. सत्यजित तांबे यांनी हा मोर्चा काँग्रेसचा नसून बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा देखील असल्याचे भाषणातून स्पष्ट करत आमदार अमोल खताळ यांच्यावर टीका केली.  मी देखील विरोधी आमदार नाही असे ते म्हणाले. आमचा पराभव झाला आहे. हे मी मान्य करतो. जनता चुकलेली नाही. आमचीच कुठेतरी चुक झाली आहे हे आज पुन्हा एकदा सांगतो.  यापुढेही तालुक्यातील प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आ. तांबे म्हणाले.  

सत्यजित तांबे हा स्वतंत्रच आहे. डॉ.सुधीर तांबेंना देखील सर्व पक्षांनी मदत केली होती. याला देखील सर्वच पक्षाच्या लोकांनी मत दिली त्यामुळे तो सर्वांचाच असल्याचे मत बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केले. 

Comments are closed.