जालना/एनजीएन नेटवर्क
सरकारचे शिष्टमंडळ मराठा आरक्षणाचा जीआर घेऊनच येईल. आम्ही त्यांची देवासारखी वाट पाहतोय. आम्ही अधिकृत काही बोलणार नाही. सरकारच्या निरोपाची आम्ही वाट पाहत आहोत. आरक्षणाचा जीआर जर आला नाही तर उपोषण थांबणार नाही. उद्यापासून पाणी देखील सोडू, असा निर्वाणीचा इशारा मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
सरकारने माफी मागितली ही चांगली गोष्टी आहे. पण माफी मागताना तुमच्या आई बहिणींना मारणाऱ्यांना कायमचे बडतर्फ करा. आम्ही काय मर्डर करणारे नाही, तरी आमच्यावर तसे गुन्हे दाखल झाले आहेत, असे जरांगे म्हणाले.
सरकारने आता मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. आताची जी पिढी लढतीय त्यांना हे अपेक्षित नाही. चर्चेशिवाय मार्ग सुटणार नाही. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही पूर्वीचेच पाढे पुन्हा वाचत बसणार. सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले असतील. तो पर्यंत आम्ही काही सांगावं असं वाटत नाही. मी अधिकृत भूमिका मांडण्यापेक्षा सरकारने 100 टक्के मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल तर सरकारचे शिष्टमंडळ मराठ्यांच्या विजयाचा कागदच घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यापेक्षा सरकारने 100 टक्के सकारात्मक निर्णय घेतला असेल. आम्ही आता त्याची वाट बघतो आहे. आरक्षणाचा जीआर आला नाही तर आंदोलन अजिबात थांबवणार नाही.
- मनोज जरांगे, उपोषणकर्ते