NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

पक्षात कोणाकोणाला घ्यावे, हा प्रश्न; वर्षभरात उलथापालथ.. महाजन

0

 मुंबई/एनजीएन नेटवर्क

ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीतले अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा केला आहे. महाजन म्हणाले, इतके जण संपर्कात आहेत की, कोणाला घ्यावे आणि कोणाला काय द्यावे, हा एक आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. संपर्कात अनेकजण आहेत, पण त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत.

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाबाबतच्या चर्चांवर विचारल्यावर महाजन म्हणाले, तेही माजी मुख्यमंत्री आहेत, तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते माजी मुख्यमंत्री आहेत. आम्हाला पुन्हा तिसरा उपमुख्यमंत्री करता येत नाही किंवा दोन मुख्यमंत्री करता येत नाहीत. सगळ्यांचा मान-सन्मान ठेवला पाहिजे. इतके जण संपर्कात आहेत की, कोणाला कसं घ्याययं आणि काय द्यावं हा प्रश्न आमच्यासमोर आहे. मी एवढंच सांगेन की, लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात बऱ्याच घडामोडी झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील.

Leave A Reply

Your email address will not be published.