NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

हनीवेल होमटाउन सोल्युशन्स फाउंडेशन महाराष्ट्रात देते शाश्वत ग्रामीण विकासाला चालना

0

भारताच्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण भारताच्या 63.64% लोकसंख्येचे योगदान असूनही त्यांना सतत आव्हानांचा सामना करावा लागतो. स्वच्छ पाणी, स्वच्छता, शिक्षण, वीज आणि रोजगाराचे मर्यादित पर्याय या येथील महत्त्वाच्या समस्या आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार, केवळ 49% ग्रामीण कुटुंबांमध्ये पाइपद्वारे पाणी पोहोचले आहे, तसेच स्वच्छतेचा अभाव असल्याने संसर्गजन्य रोग होऊन 60% मृत्यू होतात. 85% लहान शेतकरी दर महिन्याला INR 20,000 पेक्षा कमी कमावतात, ज्यामुळे उपजीविकेचे गंभीर संकट अधोरेखित होते.

पायाभूत सोईसुविधा आणि आर्थिक सुरक्षेशी संबंधित या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रयत्नासाठी, हनीवेल इंडियाची सामाजिक शाखा, हनीवेल होमटाउन सोल्युशन्स इंडिया फाउंडेशनने (HHSIF), स्थानिक समुदायांना सक्षम करणारे सहभागी ग्रामीण विकास मॉडेल लागू करण्यासाठी स्वदेस फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये करण्यात आलेल्या या भागीदारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील जीवनाला आकार देण्यासाठी पाणी व वीज, स्वच्छता, शेती, महिला कौशल्य विकास यासाठी समुदाय-केंद्रित प्रयत्न सुरू आहेत. तीन वर्षांच्या कालावधीतील या संयुक्त प्रयत्नांमुळे 40,000+ जीवनांवर थेट परिणाम झाला आहे आणि अनेक ग्रामीण कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे.

प्रशांत बलराम, वरिष्ठ संचालक, कम्युनिकेशन्स आणि सीएसआर, हनीवेल इंडिया म्हणाले, “खरी कॉर्पोरेट जबाबदारी ही व्यावसायिक मेट्रिक्सच्या पलीकडे असते, जी आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांमध्ये अर्थपूर्ण आणि शाश्वत बदल घडवून आणते. स्वदेस फाउंडेशनच्या भागीदारीत नाशिक विभागातील आमचे सुरू असलेले उपक्रम सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी आमची वचनबद्धता दर्शवितात. पायाभूत सुविधा, उपजीविका आणि कौशल्य विकासात दीर्घकालीन समृद्धीचे मार्ग तयार करण्यासाठी आम्ही स्थानिक समुदायांसोबत काम करत आहोत. एक ध्येय ठेवून त्या दृष्टीने प्रयत्न केल्याने ग्रामीण भागाचा कसा कायापालट होतो, तेथील जीवन कसे बदलू शकते आणि लवचिक, स्वयं-शाश्वत इकोसीस्टम तयार करू शकते, हे दाखविण्यासाठी ही एक संधी आहे.”

पिण्याच्या पाण्याच्या 11 प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे, 650+ घरांमधील 2,500 हून अधिक व्यक्तींना नळाचे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. पाणी योजनांमध्ये विश्वासार्ह स्रोत ओळखणे, जलाशय आणि पाइपलाइन तयार करणे व घरामध्ये सातत्यपूर्ण पाणी येईल, याची खात्री करण्यासाठी पंप लावणे समाविष्ट आहे. स्थानिक गाव समित्यांना पायाभूत सुविधा राखण्यासाठी प्रशिक्षित केले जाते, ज्यामुळे पुढील अनेक वर्षे टिकून राहण्याची खात्री केली जाते. याला पूरक म्हणून 1,700 हून अधिक घरांमध्ये आता टॉयलेट ब्लॉक्स आहेत आणि तीन शाळांमध्ये स्वच्छतेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी व कार्यक्षम शौचालयांचा फायदा होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, स्वच्छता सुविधांची देखभाल आणि योग्य वापर सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने 30 गावे शौचमुक्त (ODF) घोषित केली आहेत.

4 आंगणवाड्या आणि 3 शाळांमध्ये सौर दिवे बसविण्यामुळे स्वच्छ ऊर्जा उपक्रमाचा लक्षणीय फायदा झाला आहे. 100 शेतकऱ्यांसाठी सौर जलपंप सुरू केल्याने अनियमित वीजपुरवठ्यामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देणे शक्य झाले, ज्यामुळे पीक उत्पादनात सुधारणा, विविधीकरण आणि दरवर्षी दुसऱ्या, तसेच तिसऱ्या कापणीची शक्यता निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे केवळ उत्पन्नच स्थिरावले नाही, तर शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकर 50,000 रुपये अतिरिक्त मिळू शकले आहेत. हा प्रभाव गावपातळीवरील मोठ्या समुदायापर्यंत पोहोचविताना, हनीवेलने स्वच्छ ऊर्जेची सोय करून, घर, रस्ते आणि सार्वजनिक जागांवर 1,470 सौर दिवे बसविलेल्या धोरणाद्वारे अंदाजे 2,000 कुटुंबांपर्यंत पोहोचविले आहेत.

फळबाग लागवडीसाठी 63,000 रोपे दिल्याने या उपक्रमाचा 1500+ शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. परवडणारी रोपे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांनी मोठ्या प्लॉट्समधून वार्षिक ₹2 लाखांहून अधिक कमावण्याची क्षमता असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळविण्यासाठी सक्षम केले आहे.

उत्पन्नाचे दुय्यम स्रोत निर्माण करण्यासाठी, 524 महिलांना शेळीपालन उपक्रमांद्वारे पाठबळ मिळाले आहे, तर 156 कुटुंबांना दुग्धव्यवसाय, मासेमारी आणि मिनी पीठ गिरणीशी संबंधित संधींचा फायदा झाला आहे. हे कार्यक्रम INR 20,000 ते INR 25,000 पर्यंत अतिरिक्त वार्षिक उत्पन्न देतात. ग्रामीण युवकांच्या कौशल्यावरही लक्ष केंद्रित केले गेले आहे, गेल्या तीन वर्षांत 600 हून अधिक तरुणांनी वेल्डिंग, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल काम यांसारख्या व्यवसायांमध्ये कौशल्य प्राप्त केले आहे, ज्यामुळे मासिक उत्पन्न स्थिर आहे. शैक्षणिक सक्षमीकरणाची बांधिलकी बळकट करून 43 उपेक्षित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी, तसेच ग्रामीण भारतात त्यांचा प्रभाव वाढविण्यासाठी हनीवेल आणि स्वदेस फाउंडेशन वचनबद्ध आहेत. FY25 मध्ये या उपक्रमाचा विस्तार नाशिकमधील 10,000 अतिरिक्त ग्रामीण समुदाय सदस्यांपर्यंत केला जात आहे. एकत्रितपणे, समाजाला त्यांच्या दीर्घकालीन आणि समान वाढीसाठी महत्त्वपूर्ण संसाधने व संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे सशक्तीकरण सुरू ठेवण्याचे त्यांचे संयुक्त उद्दिष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.