लंडन : बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे घटस्फोटीत पती आणि बिझनेसमन संजय कपूर यांच्या निधनाच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला. लंडनमध्ये पोलो खेळत असताना हार्ट अटॅकमुळे 53 वर्षांच्या बिझनेसमनचा मृत्यू झाला. संजय कपूर लंडनला पोलो खेळत असताना त्यांना मधमाशी चावली आणि त्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, त्यातच त्यांना हार्ट अटॅक आला, अशी माहिती मिळत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, संजय कपूर लंडनमध्ये पोलो खेळत असताना एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली आणि तिनं चावा घेतला. त्यानंतर संजय कपूर यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे.