NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

माजी सैनिकाचा प्रामाणिकपणा; एक लाखाचा धनादेश केला परत

0

भगूर/दीपक कणसे

लहवित रहिवासी व सध्या राधा बाळकृष्ण नगर भगूर येथे राहणारे दशरथ सुकदेव वाघमारे यांना विंचुरी जवळ एक लाखाचा धनादेश मिळाला असता तो त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या देवळाली कॅम्प शाखेत शाखा व्यवस्थापक यांच्याकडे खातेदाराची चौकशी करून खातेदारास एक लाखाचा धनादेश परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल भगूरसह लहवित परिसरात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, दशरथ वाघमारे हे एका विवाह समारंभासाठी भगुर येथुन घोरवडकडे जात असताना विंचुरी बस स्टॉप जवळील रस्त्यावर त्यांना बँक ऑफ इंडिया या बँकेचा दुर्गा कृषी सेवा केंद्र या नावाने एक लाखाचा बेरल धनादेश सापडला असता त्यांनी सदरचा धनादेश घेऊन देवळाली कॅम्प येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यवस्थापक विजया कुरुप यांच्याकडे खातेदाराची चौकशी केली. सदरचा धनादेश आगसखिंड येथील शहीद सैनिक खंडू भागुजी बरकले  यांचा असल्याचे कळाले. यावेळी दशरथ वाघमारे यांनी बरकले यांच्या परिवाराशी संपर्क साधून शहीद बरकले यांच्या पत्नी व मुलगी सह भाऊ भाऊसाहेब भागुजी बरकले यांच्याकडे सदरचा एक लाखाचा धनादेश सुपुर्द केला. देशासाठी शहीद झालेल्या खंडूजी बरकले यांचा एक लाखाचा धनादेश एका माजी सैनिकाला सापडला  आणि  दशरथ वाघमारे या माजी सैनिकांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत कुठलाही लोभ न ठेवता तो धनादेश परत दिल्याने भगुर सह लहवीत परिसरात दशरथ वाघमारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.