नाशिक : एचएमएसआयला प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आपली जबाबदारी वाटते. प्रत्येक प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी कंपनी आपल्या कौशल्याचा सातत्याने वापर करत आहे. लोकाभिमुख दृष्टीकोन उंचावण्यासाठी एचएमएसआयने नुकतेच नाशिक शहरात आपल्या रस्ते सुरक्षा उपक्रमाचे आयोजन करत सहभागींवर सखोल ठसा उमटवला. नाशिक शहरातील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर एचएसएमआयने आपल्या उपक्रमाद्वारे लक्षणीय टप्पा पार केला. या उपक्रमात २३०० पेक्षा जास्त कॉलेज विद्यार्थी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या स्लोगन लिहिणे, पोस्टर बनवणे, रस्ते सुरक्षा प्रश्नमंजुषा आणि लेख लिहिण्याची स्पर्धा असे नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे उपस्थितांना खिळवून ठेवले, शिवाय सहभागींवर सखोल ठसा उमटवला.
मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि रस्त्यावरील सुरक्षेबाबत त्यांनी लहान वयापासूनच जागरूक असणे आपले रस्ते अपघातमुक्त बनवण्यासाठी आवश्यक आहे असे एचएसएमआयला वाटते. कंपनीतर्फे सातत्याने रस्ते सुरक्षा उपक्रमांचे आयोजन केले जाते. हे उपक्रम संवादी, गुंतवून ठेवणारे आणि विविध वयोगटांसाठी सुसंगत आहेत. शाळा, कॉलेज, सरकारी संस्था आणि बिगरसरकारी संस्थांमध्ये त्यांचे आयोजन केले जाते. स्थापनेपासूनच एचएमएसआयने महाराष्ट्रात ५ लाख प्रौढ आणि मुलांना रस्त्याचा जबाबदारीने वापर कसा करावा तसेच सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे याचे शिक्षण दिले आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची रस्ते सुरक्षाप्रती सीएसआर बांधिलकी वर्ष २०२१ मध्ये जाहीर करण्यात आल्याप्रमाणे ‘होंडाने २०५० पर्यंत जागतिक पातळीवर होंडा मोटरसायकल्स आणि वाहनांचा समावेश असलेले अपघात शून्यावर आणण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनी भारत सरकारच्या मदतीने देशातील अपघातांचे प्रमाण २०३० पर्यंत अर्ध्यावर आणण्याच्या
आपल्या ध्येयाच्या दिशेने काम करत आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, २०३० पर्यंत आपल्या मुलांमध्ये रस्त्यावरील सुरक्षेविषयी सकारात्मक मानसिकता रूजवणे आणि त्यानंतरही त्यांना शिक्षण देत राहाणे. शाळा व कॉलेजेसमध्ये रस्ते सुरक्षेविषयी शिक्षण पुरवून जागरूकता निर्माण करण्याबरोबरच तरुण मनांमध्ये सुरक्षिततेची संस्कृती रूजवणे व त्यांना सुरक्षेचे दूत बनवणे हे आमचे ध्येय आहे. यामुळे नव्या पिढ्या जबाबदार बनतील व सुरक्षित समाजासाठी योगदान देतील.
समाजाला हवीशी कंपनी बनण्याचे एचएमएसआयचे उद्दिष्ट आहे आणि समाजातील सर्व घटकांसाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या मदतीने रस्त्यावरील सुरक्षेविषयी जागरूकता पसरवण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. या उपक्रमाद्वारे शालेय मुलांपासून कॉर्पोरेट्सपर्यंत प्रत्येक स्तरावर जागरूकता निर्माण केली जाणार आहे. कुशल सेफ्टी इन्स्ट्रक्टर्सची आमची टीम भारतभरात आमचे १० दत्तक ट्रॅफिक ट्रेनिंग पार्क्स आणि ६ सेफ्टी ड्रायव्हिंग एज्युकेशन सेंटर्समध्ये (एसडीईसी) रस्ते सुरक्षा शिक्षण समाजातील सर्वांसाठी सहज उपलब्ध होईल याची काळजी घेते. हा उपक्रम आतापर्यंत ५.७ दशलक्ष भारतीयांपर्यंत पोहोचला आहे.
एचएमएसआयतर्फे पुढील पद्धतींच्या मदतीने रोड सेफ्टी अवेयरनेस प्रोग्रॅम मजेदार तरीही वैज्ञानिक
बनवला आहे – वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेले लर्निंग मोड्युल – होंडाच्या कुशल मार्गदर्शकांनी रस्त्यावरील चिन्हे
आणि खुणा, रस्त्यावरील चालकाचे कर्तव्य, रायडिंग गियर आणि स्थिती आणि सुरक्षितपणे गाडी
चालवण्याचे तंत्र यांवर थिअरी सत्र तयार केले आहे.
- प्रत्यक्ष शिक्षण: होंडाच्या व्हर्च्युअल रायडिंग स्टिम्युलेटरवर खास प्रशिक्षण देत सहभागींना प्रत्यक्ष
गाडी चालवण्यापूर्वी रस्त्यावरच्या संभाव्य १०० धोक्यांचा अनुभव देण्यात आला. - संवादी सत्र: सहभागींना किकेन योसोकु ट्रेनिंग (केवायटी) हे धोक्याचा अंदाज लावण्याचे तंत्र
शिकवण्यात आले, ज्यामुळे धोक्याविषयी रायडर/चालकाची धोका ओळखण्याची क्षमता तीव्र होते
व रस्त्यावरील वाहन चालवताना सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. - सद्य चालकांसाठी रायडिंग कौशल्य विकास – आधीपासून वाहन चालवत असलेले विद्यार्थी आणि
शालेय कर्मचारी यांना स्लो रायडिंग उपक्रम व अरूंद फळ्यांवर वाहन चालवत प्रशिक्षण देण्यात
आले.