NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘त्याचे’ कुटुंबिय अनफॉलो, टी-शर्ट वर अर्थपूर्ण मेसेज; मलायका वेगळ्या वाटेवर ?

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

अभिनेत्री मलायका आणि अभिनेता अर्जुन यांच्या संबंधांबद्दल चर्चांना उधाण आलेले असतानाच नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा पसरल्या आहेत. याला कारणीभूत ठरले आहे ते मलायकाने उचललेले एक मोठे पाऊल. मलयाकाने अर्जुन कपूरच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरुन अनफॉलो केले आहे. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना आणखी जोर मिळाला आहे. अर्जुनच्या बहिणी जान्हवी कपूर, खूशी कपूर ,अंशुला कपूर आणि वडील बोनी कपूर यांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.

मलायका अरोराचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिच्या टी-शर्ट लिहिण्यात आलेल्या मेसेजचा अर्थ काय असा प्रश्न चाहते विचारत आहेत.  ‘Lets fall apart’ असा मेसेज लिहिलेलं टी-शर्ट मलायकाने परिधान केलं आहे. याचा अर्थ ‘चला वेगळं होऊ या’ असा होतो. या मेसेवर एक स्माइली देखील आहे. त्यामुळे ब्रेक-अपच्या चर्चांना आणखीनच जोर आला आहे. मलायकाबरोबरच्या ब्रेकअपची चर्चा सुरु असतानाच अर्जुन कपूरचं नाव एका दुसऱ्या मुलीबरोबर जोडलं जात आहे. इल्फूएंसर कुशा कपिला आणि अर्जुन कपूर यांच्यात जवळीक वाढल्यांच बोललं जात आहे. अर्जुन आणि कुशा हे दोघं नुकतंच दिग्दर्शनक करण जोहरच्या घरी गेट टू गेदरमध्ये एकत्र दिसले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मलायका हजर नव्हती. अर्जुन कपूरने याआधी त्याच्या इन्स्टा अकाउंटवर सुट्टीतले काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटा दिसत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.