त्वचेबद्दलची जागरूकता, नवीन पिढीचे आवाज आणि नीमची परंपरा यांचा संगम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेली २५ वर्षे हिमालय वेलनेसने कोट्यवधी भारतीय तरुणांचा पिंपल्स आणि एक्ने विरुद्ध लढ्यात नीमच्या शक्तीद्वारे विश्वासू सोबती म्हणून प्रवास केला आहे. या परंपरेला पुढे नेत ब्रँडने ‘वर्ल्ड ऑफ नीम’ हा पहिला भव्य उपक्रम ताज लॅण्ड्स एंड येथे पिंपल एक्ने पॉझिटिव्हिटी डे च्या पूर्वसंध्येला आयोजित केला, ज्यामध्ये त्वचेच्या निगेबद्दल आणि आत्मविश्वासाबद्दल एक महत्त्वपूर्ण संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भारतातील जवळपास ८ पैकी ४ तरुणांनी मान्य केले आहे की पिंपल्स आणि एक्ने मुळे त्यांचा सामाजिक ठिकाणी आत्मविश्वास कमी होतो. देशात सुमारे २० कोटी किशोरवयीन आणि तरुण प्रौढ या समस्येशी झुंज देत आहेत. त्यामुळेच पिंपल एक्ने पॉझिटिव्हिटी डे हा कलंक मोडून काढण्याबद्दल, आत्मविश्वास वाढवण्याबद्दल आणि पिंपल्स व एक्नेवरील सोप्या व प्रभावी उपायांविषयी जनजागृती करण्याबद्दल आहे.
‘वर्ल्ड ऑफ नीम’ हा उपक्रम आजच्या तरुणांच्या मनाशी जुळणारा ठरावा, यासाठी डिझाइन करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्वचेची निगा कशी साधी, प्रभावी आणि सर्वंकष असू शकते, तसेच पिंपल्स व एक्ने भोवती असलेला कलंक कसा दूर केला जाऊ शकतो हे दाखवण्यात आले. हा अनुभव त्वचारोगतज्ज्ञ, सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स आणि ब्रँड अॅम्बेसेडर्स यांना एकत्र आणणारा ठरला.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ, कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि एस्थेटिक मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. रश्मी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल चर्चा घेण्यात आली. त्यांनी सर्वसामान्य समजुती दूर करत सर्वांगीण निगेचे महत्त्व अधोरेखित केले. लापता लेडीज चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री नितांशी गोयल हिने स्वतःच्या त्वचेचे अनुभव शेअर करत पिंपल्स हे वाढत्या वयाचा नैसर्गिक भाग आहेत – त्यांना लपवण्यासारखे काही नाही हे सांगितले.
हिमालयने आपल्या आयकॉनिक नीम फेस वॉशची नवी ओळख करून दिली आता अनोख्या 5 -पार्ट्स ऑफ नीम फॉर्म्युलेशन सह जे पिंपल्सची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेते आणि पिंपल्सपासून बचाव करते यामुळेच तो भारताचा क्रमांक १ फेसवॉश ब्रँड ठरला आहे आणि कोमल, नैसर्गिक निगा देणारा विश्वासू साथी ठरला आहे .
श्री. राजेश कृष्णमूर्ती, बिझनेस डायरेक्टर – कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिव्हिजन, इंडिया, हिमालय वेलनेस यांनी सांगितले: “हिमालय वेलनेसमध्ये आम्ही मानतो की त्वचेची निगा कोमल, प्रभावी आणि नैसर्गिक असावी. आमचा नीम फेस वॉश गेली २५ वर्षे दैनंदिन निगेचे प्रतीक आहे. नव्या 5 -पार्ट्स ऑफ नीम फॉर्म्युलेशनमुळे आम्ही ही परंपरा अधिक मजबूत करत आहोत आणि विशेषतः तरुणांना आत्मविश्वासाने आपली त्वचा स्वीकारण्यासाठी प्रेरित करत आहोत.”
सुश्री रागिनी हरिहरन, मार्केटिंग डायरेक्टर – ब्युटी अँड पर्सनल केअर, हिमालय वेलनेस म्हणाल्या: “आजच्या ग्राहक ट्रेंड्समध्ये, विशेषतः जनरेशन झेड मध्ये, निसर्गप्रेरित आणि विज्ञानाधारित उपायांकडे झुकाव वाढताना दिसतो आहे. हा कार्यक्रम त्याचं प्रतीक आहे – नीम जो पिढ्यानपिढ्या विश्वासार्ह ठरला आहे, तो सौंदर्य व व्यक्तिगत निगा क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवण्यात आजही तितकाच सुसंगत आहे. या कार्यक्रमाद्वारे आम्ही प्रत्येक प्रकारची त्वचा स्वीकारतो आणि त्वचेची निगा कोमल, प्रभावी आणि काळजीपूर्वक करण्यासाठी एक मंच निर्माण करत आहोत.”
कार्यक्रमात उपस्थित अभिनेत्री नितांशी गोयल हिने सांगितले: “आमच्या पिढीवर नेहमीच चांगलं दिसण्याचा दबाव असतो, मला वाटतं की खरी त्वचा सुंदर असते हे आपण स्वतःला आठवण करून देणं महत्त्वाचं आहे. हिमालयचं वर्ल्ड ऑफ नीम आपल्याला अगदी हाच संदेश देतं की आपण आपल्या त्वचेवर नैसर्गिकपणे व आत्मविश्वासाने प्रेम करू शकतो, तिला लपवण्याची किंवा लाजण्याची गरज नाही.”
डॉ. रश्मी शेट्टी म्हणाल्या “पिंपल्स ही सर्वात सामान्य त्वचेची समस्या आहे आणि ती पूर्णपणे नैसर्गिक असली तरी, तिच्याशी संबंधित मानसिक या सामाजिक परिणाम लोकांवर अधिक होतो . नीमला भारतात पिढ्यानपिढ्या शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल आणि शीतल गुणांसाठी विश्वास मिळालेला आहे. योग्य पद्धतीने वापरल्यास, तो त्वचेसोबत सुसंवाद साधतो – कोमल, प्रभावी आणि विज्ञानाधारित निगा देतो. यामुळे लोकांना पिंपल्स नियंत्रित करण्यात मदत तर होतेच, पण त्यांना स्वतःच्या त्वचेबद्दल आत्मविश्वासही वाटतो.” या पहिल्याच अशा उपक्रमाद्वारे हिमालय वेलनेस संपूर्ण देशभर त्वचेवरील सामान्य समस्या मोडून काढण्यासाठी आणि तरुणांना अधिक आरोग्यपूर्ण, सर्वंकष दृष्टिकोनातून त्वचेची निगा स्वीकारण्यासाठी प्रेरित करू इच्छिते. ‘वर्ल्ड ऑफ नीम’ हा केवळ कार्यक्रम नाही – तर पिंपल एक्ने पॉझिटिव्हिटी डे हा आत्मस्वीकार, आत्मविश्वास आणि निसर्गाच्या शक्तीवर आधारित निगेबद्दल आहे. ‘वर्ल्ड ऑफ नीम’ सोबत हिमालयने देशभरातील ५ लाख+ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारा शालेय कार्यक्रमही सुरू केला असून, यात पिंपल पॉझिटिव्हिटी आणि पिंपल्सशी निगडीत प्रभावी उपायांबद्दल शिक्षण दिले जाणार आहे.
Comments are closed.