NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

हॅलो गोदरेज – पीक संरक्षणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटने सुरू केली शेती सल्लागार हेल्पलाइन

0

NASHIK, : भारतातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण अन्न आणि कृषी-व्यवसाय समूहाच्या गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडने (जीएव्हीएल) नुकतीच ‘हॅलो गोदरेज’ ही बहुभाषिक शेती सल्लागार हेल्पलाइन सुरू करण्याची घोषणा केली आहे. जी पीक संरक्षणासाठी केवळ एका फोनवर तत्काळ कृषी तज्ज्ञ उपलब्ध करून देते. देशभरातील शेतकऱ्यांसाठी हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, बंगाली, पंजाबी आणि इंग्रजी या आठ प्रादेशिक भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल. कंपनीचा हा नवा उपक्रम शेती उत्पादकता सुधारण्याच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. यामुळेच शेतकऱ्यांना जेव्हा-जेव्हा गरज भासते, तेव्हा प्रत्यक्षात किंवा कॉलवर हे तज्ज्ञ उपलब्ध असतात.

या उपक्रमावर भाष्य करताना गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, “आम्हा गोदरेज ॲग्रोव्हेटमध्ये करत असलेल्या प्रत्येकाचा केंद्रबिंदू शेतकरी कुटुंबांचे उत्थान आहे. चांगल्या उत्पादनासाठी योग्य वेळ, योग्य वापर आणि योग्य सल्ला अत्यावश्यक असतो. “हॅलो गोदरेज” रिअल-टाइम वैयक्तिकृत उपाय ऑफर करून शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांमधील अंतर कमी करण्यात मदत करेल.”

बदलते हवामान आणि किडींचे वाढते प्रमाण यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा सतत बदलणाऱ्या शेतीच्या परिस्थितीत, शेतकऱ्यांना नवीनतम पीक संरक्षण उपाय आणि त्यांच्या पसंतीच्या भाषेत वैयक्तिक मार्गदर्शन मिळविण्यासाठी सक्षम करणे ही एक काळाची गरज आहे. “हॅलो गोदरेज” द्वारे भारतातील शेतकरी आता आमच्या कृषी तज्ज्ञांच्या टीमकडून थेट संवादाद्वारे रिअल टाइम सल्ल्याचा फायदा घेऊ शकतात. शाश्वत आणि फायदेशीर शेतीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासात “हॅलो गोदरेज” भारतीय शेतकऱ्यांसाठी सर्वात विश्वासू भागीदार बनण्याच्या कंपनीच्या दृष्टीला मूर्त रूप देते. गोदरेज ॲग्रोव्हेटच्या व्यापक अनुभवाचा आणि प्रतिष्ठेचा फायदा घेत, शेतकऱ्यांशी मजबूत, विश्वासार्ह नातेसंबंध निर्माण करणे, कृषी क्षेत्रातील विश्वसनीय माहितीचे स्रोत बनविणे आणि कृषी क्षेत्रातील त्याचे नेतृत्व मजबूत करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडच्या पीक संरक्षण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजावेलू एनके यांनी सांगितले.

शेतकरी कुटुंबांच्या उन्नतीसाठी दर्जेदार आणि विश्वासार्ह उत्पादने देण्याच्या दीर्घकाळापासून असलेल्या गोदरेज ॲग्रोव्हेटच्या वचनबद्धतेसह शेतकऱ्यांच्या गरजा आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी या उपक्रमाद्वारे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा मानस आहे.
Helpline Number: 022 2519 4491

Leave A Reply

Your email address will not be published.