मुंबई/एनजीएन नेटवर्क
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच मुंबईसह सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सक्रिय मान्सूनच्या स्थितीमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, पालघर आणि पुणे येथे ३० जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.