NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

पुढील 4-5 दिवस मुसळधारांचे; नाशिकसह अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

0

पुणे/एनजीएन नेटवर्क

ऑगस्ट महिन्यात दडी मारुन बसलेला पाऊस सप्टेंबरमध्ये सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 यंदाचा ऑगस्ट हा देशातील 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना ठरला आहे. इतिहासातील चौथा मोठा मान्सूचा ब्रेक म्हणून नोंदवला गेला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये पाऊस पुनरागमन करणार  असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात पुढच्या 4-5 दिवसात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार स्थितीमुळं तिथे येत्या 48 तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे, अशी माहिती कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच 3-7 सप्टेंबरमध्ये कोकण आणि गोव्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.  5 ते 7 सप्टेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे. राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.