पुणे/एनजीएन नेटवर्क
पुढच्या 5 दिवसात राज्यात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसांची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असल्याची माहिती समोर येतीये. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. जळगाव, नाशिक, धुळे, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम किनारपट्टीवर पुढील 4 ते 5 दिवस वेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य भारताच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे. गुजरात किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून इथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.