घोटी/राहुल सुराणा
राहत्या वस्तीपासून रुग्णालयात नेण्यासाठी रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या जुनावणे वस्ती येथे घडली आहे. वनिता भावडू भगत ( वय २३ ) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वनिताला गरोदरपणात प्रसवकळा सुरु झाल्याने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात भर्ती करण्यासाठी वस्तीला रस्ताच नसल्याने डोली करून साडेतीन किलोमीटर अंतर पायपीट केली. यादरम्यान कुटुंबाची ससेहोलपट पाहायला मिळाली. मात्र, वनिताला नाशिक येथे नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरी ७५ वर्षांत आपण आदिवासीना न्याय देऊ शकलो नाही. हे सत्य नाकारून चालणार नाही. राज्याचे पावसाळी अधिवेशन एका बाजूला होत असतांना दुसऱ्या बाजूला ही हृदय पिळवाटून टाकणारी गोष्ट भयानक म्हणावी लागेल.
————————————-
@ आम्हाला आता आत्मक्लेश केल्याशिवाय पर्याय नाही. किती बिकट परिस्थिती आदिवासीच्या वाट्याला येतेय हे सत्ताधारी लोकप्रतिनिधिनी आदिवासी भागातील निधीला कात्री लावताना पोटच्या पोराचा विचार डोळ्यासमोर आणावा.
– सीताराम गावंडा, कार्याध्यक्ष, राया ठाकर फाउंडेशन, महाराष्ट्र