नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क
घरात झोका खेळताना दोरीचा गळफास लागून दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चुंचाळे शिवारातील म्हाडा कॉलनीत शुक्रवारी घडली. निखील सैंदाणे असे मृत बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, निखील काल सायंकाळी आपल्या घरात बांधलेल्या झोक्यावर खेळत होता. यावेळी सुती दोरी अडकल्याने त्याला गळफास लागला. ही बाब लक्षात येताच आई दीपाली सैंदाणे यांनी दोरी सोडून खाली उतरविले. तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.