जालना/एनजीएन नेटवर्क
मराठा आरक्षणासाठी मागील ९ दिवसांपासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांनी हे उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान डॉक्टरांचे पथक आंदोलनस्थळी दाखल झाले आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे यांच्या उपषोणाचा आज ९वा दिवस असून मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याने. वैद्यकीय पथक उपोषनस्थळी दाखल झाले आहे. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाणी पतळी कमी झाल्याने आज त्यांना सलाइन लावण्यात आले. यापूर्वी राज्य सरकाच्या शिष्ठमंडळाकडून मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, एक महिन्याचा वेळ द्यावा,असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. मात्र एक महिन्याचा वेळ कशाला हवा? चार दिवसांची वेळ पुरेसा आहे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.