NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

माझा गैरवापर करणारा सुपरस्टार झाला.. सलमानवर एक्स गर्लफ्रेंड भडकली

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत एक क्रिप्टीक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा करत  एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये सलमानचे नाव न घेता, ‘माझा गैरवापर करणारा आता सुपरस्टार झाला आहे’ असे म्हणत भाईजानवर निशाणा साधला आहे.

सोमी अलीने या पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘पुन्हा मला ही पोस्ट हटवण्यास सांगितले जाईल. लोक माझ्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करतील. माझ्या दारू पिण्याच्या सवयींबद्दल बोलले जाईल, तरीही मी आवाज उठवणं चालू ठेवेन. कारण तुम्ही त्या अपमानाचा आणि छळाचा सामना कलेला नाही. तेव्हा कोणीही माझ्या पाठीशी उभे राहिले नाही कारण माझा छळ करणारा व्यक्ती एक सुपरस्टार होता. माझे मित्रही त्याच्या पाठीशी उभे राहिले. कारण तो तुमचे करिअर एकतर बनवू शकतो किंवा बिघडवू शकतो.’

Leave A Reply

Your email address will not be published.