लखनऊ/एनजीएन नेटवर्क
प्रेमासाठी वाट्टेल ते असे आपण अनेकदा अनुभवतो. अनेकदा माणूस एखाद्याच्या प्रेमात इतका इतका वेडा होतो की परिणामांचा विचार न करता त्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो. अशीच एक घटना आता प्रयागराजमधून समोर आली आहे. यात एका तरुणाने प्रेमात आपल्या पुरुष प्रियकरासाठी चक्क आपले लिंगच बदलले. इतकेच नाही तर दोघांनी मंदिरात लग्नही केले आणि शारिरीक संबंधही ठेवले. मात्र आता प्रियकराने सोबत राहण्यास नकार दिला.
हे प्रकरण प्रयागराजला लागून असलेल्या कौशांबी जिल्ह्यातील आहे. या परिसरात राहणारा राहुल हा नाटकात नर्तक म्हणून काम करतो. 2016 मध्ये शेजारील गावातील तरुणाने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. लग्नाचं वचन देत अनेकवेळा त्याच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले. राहुल प्रियकरासाठी लिंग बदलून रागिणी बनला. लिंग बदलल्यानंतर लग्न झालं आणि आता प्रियकर त्याला पत्नी म्हणून ठेवण्यास नकार देत आहे. पोलीसही याप्रकरणात गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत.