पुणे/एनजीएन नेटवर्क
तरुणांना इसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी असलेला डॅाक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने इसिस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात ही कारवाई केली आहे. डॉ. अदनान अली असे या भूलतज्ञ डॉक्टरचे नाव असून तो पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. कोंढवा परिसरात ते भूलतज्ञ होते. तरुणांना इसिसची माहिती देऊन त्यांना इसिसच्या जाळ्यात अडकवण्याचे काम करत होता.
इसिसच्या महाराष्ट्र मॅाड्युलमध्ये राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातल्या कोंढव्यातून डॉ. अदनान अली सरकारला इसिसच्या दहशतवादी विचाराचा प्रसार केल्याचा आरोपांखाली अटक केल्याने पुण्याच्या वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इसिसच्या महाराष्ट्र मॅाड्युलचा उलगडा करत महिन्याभरापूर्वी एनआयएने मुंबईत गुन्हा दाखल करून तीन आरोपीना अटक केली होती. त्यापैकी जूबेर शेख नावाचा संशयित आरोपीही एनआयएने अटक केला होता. या आरोपीकडे केलेल्या चौकशीत पुण्यातील प्रसिध्द भूलतज्ज्ञ डॅा. अदनान अली सरकार यांच नाव समोर आलं होतं. त्यानंतर एनआयएने डॉ. अदनान अली सरकारची तीन दिवस कसून चौकशी केली आणि अखेर त्याला अटक केली.