नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क
परिसरातील राजे संभाजी स्टेडियमचे काम निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने स्टेडियममध्ये चक्क बोकड बळी दिल्याची घटना घडली आहे. हा आश्चर्यकारक प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांसह अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणासाठी महापालिका आयुक्तांनी दोन कोटी 93 लाखांचा निधी मंजूर केला आहे. हे काम काम निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून माजी नगरसेविका स्टेडियममध्ये चक्क बोकडाचा बळी दिला आहे. नुकताच महापालिका आयुक्तांनी दोन कोटी 93 लाखांचा निधी स्टेडियमच्या कामांसाठी मंजूर केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने बोकडाचा बळी दिला. या कृत्यावर परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. अशा प्रकारचा दैवी आणि अवैज्ञानिक तोडगा करणे आणि बोकड बळी देणे हे लोकांना अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिली आहे. माजी नगरसेविकेने स्टेडिअमच्या प्रांगणात थेट होमहवन, पूजा-अर्चा करीत चक्क बोकडाचा बळी देणे कितपत योग्य आहे, असा सवालही विचारला जात आहे.