NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

ते आले..कोर्टाचे कामकाज पाहिले आणि राजीनामा देवून निघून गेले !

0

नागपूर/एनजीएन नेटवर्क

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायामूर्ती रोहित देव यांनी निवृत्तीला एक वर्ष बाकी असताना आज भर कोर्टातच राजीनामा दिला. देव यांनी कोर्टातच राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. देव यांनी कोर्टात राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांची ही घोषणा ऐकून उपस्थित वकील आणि कोर्टाचे कर्मचारीही अवाक झाले होते. त्यानंतर कोर्ट परिसरात केवळ देव यांच्या राजीनाम्याचीच चर्चा सुरू होती.

सकाळी कोर्ट सुरू झाल्यानंतर न्यायमूर्ती रोहित देव यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले. सर्वा कामकाज नियमितपणे हाताळल्यानंतर त्यांनी कोर्ट रूममध्येच न्यायामूर्तीपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आणि काही न बोलता ते कोर्टातून निघून गेले. देव यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

दिलगिरीही व्यक्त

@ न्यायमूर्ती रोहित देव यांनी सर्वांकडे दिलगिरीही व्यक्त केली. मी उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वागण्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगीर आहे. मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. सेवेतून मुक्त होत आहे, असं रोहित देव यांनी राजीनामा देताना सांगितलं. वकिलांनी कठोर मेहनत करत राहावी, असा सल्ला देतानाच काही प्रसंगी मी तुमच्यासोबत कठोर वागलो, त्याबद्दल दिलगीर आहे, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.