नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील सर्वात मोठी हाऊसिंग कंपनी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचे १ जुलैपासून विलिनीकरण होणार आहे, अशी माहिती एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी फायनान्स एचडीएफसी बँकेचा एक भाग बनेल.
एचडीएफसी कंपनी १३ जुलैपासून ‘एचडीएफसी बँक नावाने आपले शेअर ट्रेड करणार असल्याची माहितीदेखील एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली. एचडीएफसी बँकेने गेल्या वर्षी ४ एप्रिल रोजी एचडीएफसीचे अधिग्रहण करण्याचे मान्य केले होते. लवकरच होणा-या प्रस्तावित संस्थेची एकत्रित मालमत्ता सुमारे १८ लाख कोटी रुपयांची असेल. एचडीएफसी बँक आणि एचडीएसएफ लिमिटेड यांच्या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक ही जगातील पाचवी सर्वात मोठी बँक बनेल. एप्रिल २०२३ पर्यंत एचडीएफसी बँक जगातील मार्केट कॅपमध्ये अकराव्या क्रमांकावर होती.