मुंबई/एनजीएन नेटवर्क
वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने गुरुवारी फेटाळून लावला. मलिक हे आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे मलिक यांना मोठा झटका बसला आहे.
न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निकाल दिला आहे. तसेच दोन आठवड्यांनंतर त्यांच्या जामीनाच्या याचिकेवर योग्यतेनुसार सुनावणी घेण्यात येणार आहे. आपले एक मुत्रपिंड निकाली झाले असून दुसरे केवळ ६० टक्के काम करत आहे. ही स्थिती आणखी बिघडत आहे, त्यामुळं आपल्याला योग्य पद्धतीनं उपचार करता यावेत यासाठी जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मलिक यांनी आपल्या याचिकेतून केली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटकेपूर्वीपासून मलिकांना किडनीचा त्रास आहे. दरम्यान, ईडीनं मलिकांच्या याचिकेला विरोध करताना असे अनेक लोक आहेत जे एकाच किडनीवर जगू शकतात. मलिकांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांच्या दुसऱ्या किडनीची केवळ ६० टक्केच प्रक्रिया सुरु असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे मलिकांच्या केसमध्ये जामीन मंजूर करण्यात येऊ नये.