NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

तुम्हाला भाजपने ऑफर दिलीय का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुपचूप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे, अशा बातम्या समोर येत असतानाच स्वतः जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझी अमित शाहांशी भेट झाली नाही. मी मागील तीन दिवसांपासून पक्षाच्या कामानिमित्त शरद पवारांची सलग भेट घेत आहे. आजही मी शरद पवारांची भेट घेतली आहे. प्रसारमाध्यमांतून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे माझी करमणूक होत आहे, असे विधान जयंत पाटील यांनी केले.

तुम्हाला भाजपने ऑफर दिली आहे का, या प्रश्नावर जयंत पाटलांनी उत्तर दिले आहे. भाजपाने दिलेल्या ऑफरबद्दल जयंत पाटलांनी थेट खुलासा केला नसला तरी माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. मी दररोज शरद पवारांना भेटत आहे, असे उत्तर त्यांनी दिले. पाटील म्हणाले, माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. मी शरद पवारांना रोज भेटत आहे. आमचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्यही शरद पवारांची भेट घेत आहेत. पण कालपासून मी महायुतीत जाणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. त्या बातम्या मोबाईलवरही येत आहेत, यामुळे माझीही करमणूक होत आहे. या करमणूकीत आज सकाळी भर पडली. त्यानंतर दुपारी आणखी भर पडली. ही करमणूक महाराष्ट्रातील जनतेमध्ये माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारी आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.