घोटी/राहुल सुराणा
इगतपुरी -त्र्यंबकेश्वरच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे सुपुत्र हर्षल रमेश गावित ( वय ३७ ) यांचे नाशिक येथील साह्याद्री हॉस्पिटल येथे बुधवार ( दि. १२ ) रोजी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
ते देवमोगरा सेवाभावी संस्थेचे संचालक काँग्रेसचे काही काळ जिल्हा सरचिटणीस म्हणुन त्यांनी कामकाज पहिले होते. प्रचंड जनसंपर्क व जनसेवा कार्याच्या माध्यमातून ते परिचित होते.
इगतपुरी -त्र्यंबकेश्वर आदिवासी भागात त्यांना रिंकू दादा या नावाने म्हणुन सर्व सामान्य नागरिकांना ते परिचित होते. आदिवासी समाजाच्या अडिअडचणी यांसह शासकीय योजना तळागाळातील जनतेला मिळाव्यात म्हणुन ते देवमोगरा संस्था व जिल्हा काँग्रेसच्या व शिवसेनेच्या वतीने प्रयत्न करीत होते. त्यांचा स्वभाव व आदर देण्याच्या पद्धतीने सर्व सामान्य जनतेला आकर्षित करत असत. या घटनेची माहिती मतदारसंघ परिसरात पोहचताच अनेक मतदार व गावित कुटूंबीयांना मानणाऱ्या नागरिकांनी दुःख व्यक्त केले.