** संतोष बिरे
वावी : एनजीएन न्यूज नेटवर्क
सिन्नर तालुक्यातील वावी येथे दिव्यांग दिनानिमित्त येथील रुग्णांना तसेच अपंग व्यक्तींना उपयोगी पडेल असे साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब वाघ, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास भाऊ पांगारकर, रिटायर उपविभागीय अधिकारी विलास सानप, दुसंगवाडीचे सरपंच कानिफनाथ घोटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
दिव्यांग दिन अर्थात अपंग दिन आज तीन डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्या दिवशी दिव्यांगा बाबत समाजात जनजागृती होण्यासाठी तसेच त्यांच्या बाबत समाजात आदर सहानुभूती निर्माण होईल , त्यांच्या अडचणी समजतील आणि त्यांच्या अडचणीवर सहजपणे मात करता येईल यासाठी संपूर्ण जगभर हा दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो.
याप्रसंगी शिवदास घेगडमल, फुलेनगर चे सरपंच रविकिरण पठाडे , सिन्नर मार्केट कमिटीचे सभापती कृष्णा घुमरे नाशिक जिल्हा दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार ,सिन्नर तालुका दिव्यांग संघटनेचे अरुण पाचोरे , समाज प्रबोधनकार नायब तहसीलदार दत्ता वायचळे, गणपत नाठे , भाऊसाहेब सांगळे, नंदू शिरसाठ,सामाजिक कार्यकर्ते दिपक वेलजाळी, दत्ता लोंढे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली.
येथील दिव्यांग संघटनेने गावातील दिव्यांग तसेच गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक हॉस्पिटल बेड १, व्हीलचेअर 2, वॉकर 5, फोर स्ट्रोक थ्री स्ट्रोक सिंगल स्ट्रोक वॉकिंग स्टिक 5, रक्तदाब बीपी मोजण्याचे मशीन 1, वाफ देण्याचे मशीन 1, अपघाती बाथरूम खुर्ची 2, गरम पाण्याच्या बॅक 2, कुबड्या 2 इत्यादी वस्तूंचे लोकार्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग संघटनेचे वैभव वेलजाळी, किरण संधान, केशव ताजने, संजू गायकवाड, संकेत काटे, संतोष बीरे, ऋषिकेश पाचपाटील,विलास निकम, सतीश वेलजाळी , संपत जाधव,विशेष परिश्रम घेतले यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश वेलजाळी यांनी केले तर आभार पत्रकार संतोष भोपी यांनी व्यक्त केले.
Comments are closed.