नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे पाथर्डी जवळील खत प्रकल्प कचरा डेपो मधील कचरा वेचणाऱ्या महिलांना हॅन्ड ग्लोज वाटप करण्यात आले.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांच्या मदतीने ही मदत करण्यात आली. याप्रसंगी नाशिक शहर महिला आघाडी अध्यक्ष योगिता आहेर, नविन नाशिक अध्यक्ष मकरंद नाना सोमवंशी, अमोल महाले, डॉ.पूनम महाले, शहर उपाध्यक्ष पुष्पाताई राठोड, प्रभाग क्रमांक 31अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष अक्षय परदेशी आदी उपस्थित होते