मुंबई/एनजीएन नेटवर्क
तेलगी प्रकरणावरुन शरद पवार यांनी आपला राजीनामा घेतला, या मुद्द्यावर तुटून पडलेल्या छगन भुजबळ यांना पवार यांच्याकडून उत्तर देण्यात आले. तेव्हा राजीनामा घेतला नसता तर छगन भुजबळ तुरुंगात गेले असते, असे पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. तीत प्रमुख मार्गदर्शन करताना पवार यांनी उपरोक्त विधान केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची दोन दिवसांपूर्वी रविवारी बीडमध्ये जाहीर सभा पार पडली होती. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तेलगी प्रकरणावरुन शरद पवार यांनी आपला राजीनामा घेतला. पण आपणच तेलगी विरोधात कारवाई केली होती, असे भुजबळ म्हणाले होते. त्याला शरद पवार यांनी आजच्या बैठकीत उत्तर दिले.