सिन्नर/एनजीएन नेटवर्क
सिन्नर शिर्डी रस्त्यावर पिंपरवाडी टोल नाक्याजवळ ५० लाखांचा गुटखा आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अशोक लेलँड ट्रक( क्र एम एच २८ बी बी २४३८) व टोयोटा इनोव्हा (एम एच ४६ एल २९९९) ची तपासणी केली असता त्यात ७५ गोण्यामध्ये भरलेला ३० लाख ७८ हजारांचा सुगंधी पानमसाला गुटखा मिळून आला . याबाबत पोलीस नाईक देविदास माळी यांनी फिर्याद दिली असून सलीम खान अफसर खान,अहमद खान रेहमद खान,समीर खान अफसर खान ,शेख रेहमान शेख रहीम, अरीफ खान दिलावर खान (सर्व रा.ताजनगर अलीमनगर अमरावती) यांच्या विरोधात ३२८,१८८,२७२,२७३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात २० लाखांचे दोन्ही वाहनेही जप्त केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक देविदास माळी,शेलार,भास्कर जाधव आदींच्या पथकाने केली.