गांधीनगर/एनजीएन नेटवर्क
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज गुजरात हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. सेटलवाड यांनी तत्काळ आत्मसमर्पण करावे, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात षडयंत्र केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात तीस्ता सेटलवाड यांना सप्टेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. अंतरिम जामीनामुळे इतके दिवस त्यांची अटक टळली होती. भारताचे सरन्यायाधीश (CJI) उदय उमेश ललित यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने तीस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामिनाचा आदेश दिला होता. या प्रकरणी 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने तीस्ता सेटलवाड यांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला होता.